(रत्नागिरी)
शहरानजीकच्या आदिष्टीनगर येथील तरुणीने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमाराला उघडकीस आली. रसिका शांताराम सनगरे (२४, रा. आदिष्टीनगर मजगाव रोड, रत्नागिरी) असे तरुणीचे नाव आहे.
रविवारी रात्री तिने घरातल्यांसोबत जेवण केल्यानंतर ९ वाजण्याच्या सुमारास ती आपल्या खोलीत गेली. रात्री १२:३० वाजण्याच्या सुमाराला तिच भाऊ कामावरून घरी आला त्यावेळी त्याला रसिका तिच्या खोलीत फॅनला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्याने आरडा-ओरडा केल्यानंतर घरातील इतर नातेवाईकांनी रसिका च्या खोलीत धाव घेतली. सर्वांनी मिळून तिला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवल होती. रत्नागिरी शहर पोलिसांन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.