(कोल्हापुर)
महायुतीची संयुक्त सभा मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात झाली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते. कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. २३ तारखेला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी येथे येणार आहोत, असाही विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी महाविकास आघाडीववर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, राज्यातील महिला, शेतकरी, वृद्ध आणि तरुणांसाठी 10 महत्त्वाच्या घोषणाही केल्या आहेत.
1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी इथूनच प्रचाराचा शुभारंभ केला आणि इतिहास घडला. आई अंबाबाईने नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिला आहे, आजही आई अंबाबाई आम्हाला आशीर्वाद देईल. यावेळी, 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथे येऊ. लाडक्या बहिणींच्या अशिर्वादामुळे ही योजना सुपरहिट झाली. त्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशुळ उठले आहे, काही सावत्र भाऊ ही योजना बंद पडावी म्हणून कोर्टात गेले आहेत. पण हा एकनाथ शिंदे जेलमध्ये जाईल पण ही योजना कधीही बंद पडू देणार नाही, असा निर्धारही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. वचननाम्यातील 10 कलमे जनतेच्यासमोर ठेवतो आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील मोठी घोषणा सांगितली. त्यानुसार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा मिळणार असल्याची माहिती दिली.
एकनाथं शिंदे यांनी केल्या १० मोठ्या घोषणा
- लाडक्या बहिणींना रु. 2100 प्रत्येक महिन्याला रु. 1500 वरुन रु. 2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करणार
- शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देणार
- प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देणार
- वृद्ध पेन्शन धारकांना रु. 2100 महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देणार
- जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार
- 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देणार
- 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधणार
- अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 आणि सुरक्षा कवच महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देणार
- वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार
- सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर करणार