मनोरंजन विश्वातील कलाकारांचं आयुष्य ऐशो आरामाचं असतं. उच्च दर्जाची जीवनशैली अनुभवत असतात, असं सर्वसामान्यांना वाटतं. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा दिसतं. पण, हे ऐशो आरामाचं जगणं प्रामुख्यानं स्टार कलाकारांच्या नशिबी असतं. हिंदी-मराठी मनोरंजन विश्वातील अनेक नवोदित कलाकारांना संघर्ष करण्याशिवाय पर्याय नसतो.
अनेक कलाकार कामासाठी बाहेरून मुंबईत येतात. अशा कलाकारांच्या हातात काम असून देखील त्यांना मुंबईत राहायला भाड्यानं घर मिळत नाही, त्यामुळं अनेकजण फ्लॅट् शेअर करतात. पण त्यांच्या प्रयत्नांना यश येतं आणि एक दिवस येतो की, या मुंबईत ते त्यांचं हक्काचं घर घेतात. आणि आपलं स्वतःच घर घेण्याचं स्वप्न यातून पूर्ण होत. अश्याच काही मराठमोळ्या कलाकारांनी या सरत्या वर्षात आपल्या हक्काचं नवीन घर खरेदी केलं आहे. सई ताम्हणकरपासून, प्राजक्ता माळी, अक्षय केळकर ते पृथ्वीक प्रतापपर्यंत अनेक मराठी सेलिब्रिटींचं घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
प्राजक्ता माळी : अभिनेत्री प्राजक्ता माळीने कर्जमध्ये स्वत:चं फार्म हाऊस घेतलं आहे. प्राजक्ताचं हे फार्म हाऊस निसर्गाच्या कुशीत आहे. 3 बेडरूम्स, हॉल, किचन , स्विमिंगपूल असं तिचं आलिशान फार्महाऊस आहे.
सई ताम्हणकर : सई ताम्हणकर 2023 मध्ये मुंबईकर झाली आहे. मुंबईत तिने स्वत:चं पहिलं घर घेतलं आहे. मुंबईत घर घेतल्यानंतर तिने गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
धनश्री काडगावकर : ‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकरने नवं घर घेतलं आहे. 2023 मध्ये अभिनेत्रीचं कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. अभिनेत्रीने गणेशोत्सवादरम्यान नवीन घर खरेदी केलं.
हृता दुर्गुळे : हृता दुर्गुळेसाठी 2023 हे वर्ष खूपच खास होतं. या वर्षात हृता लग्नबंधनात अडकली असून याच वर्षी तिने नवं घर घेतलं आहे. नव्या घरातील पतीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत तिने चाहत्यांना गुडन्यूज दिलं आहे.
अक्षय केळकर : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकरसाठी हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो ‘बिग बॉस मराठी 4’चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे.