ज्योतिषशास्त्रानुसार लग्नासारख्या शुभ कार्यासाठी शुक्राचा उदय असणे आवश्यक असते. पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये लग्नासाठी किती शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घेऊया. हिंदू विवाहात तारीख निश्चित करताना विवाह मुहूर्त खूप महत्त्वाचा असतो. असं मानलं जातं की अशुभ विवाहकाळात केलेले विवाह अनेकदा जोडप्यावर नकारात्मक परिणाम करतात. यामुळे लग्न केवळ शुभ मुहूर्तावरच केले जाते. शुभ मुहूर्तावर केलेली शुभ कार्ये विना अडथळा पूर्ण होतात असे मानले जाते. विशेषतः हिंदू धर्मात लग्नासाठी शुभ मुहूर्त खूप महत्त्वाचा असल्यामुळे सर्वच लोक शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात.
लग्नापूर्वी वधू-वरांच्या कुंडल्या पाहिल्या जाण्याची आपल्याकडे प्रथा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार एका वर्षात एकूण ४ अबुझ मुहूर्त असतात. यामध्ये आखा तीज, देवूठाणी एकादशी, बसंत पंचमी आणि भादमी नवमी यांचा समावेश होतो. म्हणजेच या चार प्रसंगी मुहूर्त नसला तरी लग्न वगैरे शुभ कार्य करता येतात. ज्योतिषशास्त्रानुसार लग्नासारख्या शुभ कार्यासाठी शुक्राचा उदय आवश्यक आहे. पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये लग्नासाठी किती शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घेऊया.
2023 मध्ये लग्नासाठी 59 शुभ मुहूर्त
पंचांगानुसार 2023 मध्ये लग्नासाठी एकूण 59 शुभ मुहूर्त आहेत. यामध्ये जानेवारीमध्ये 9, फेब्रुवारीमध्ये 13, मेमध्ये 14, जूनमध्ये 11, नोव्हेंबरमध्ये 5 आणि डिसेंबरमध्ये 7 विवाह शुभ मुहूर्त आहेत.
जानेवारी 2023- 15, 16, 18, 19, 25, 26, 27, 30, 31
फेब्रुवारी 2023 – 6, 7, 8, 9 10, 12, 13, 14, 15, 17, 22 23, 28
मे 2023 – 4, 6, 8, 9, 10, 11, 15, 16, 20, 21, 22, 27, 29, 30
जून 2023 – 1, 3, 5, 6, 7, 11, 12, 23, 24, 26, 27
नोव्हेंबर 2023 – 23, 24, 27, 28, 29
डिसेंबर 2023 – 5, 6, 7 8, 9, 11, 15
मार्च 2023 मध्ये होळाष्टक आणि एप्रिलमध्ये धनु महिन्यामुळे कोणतेही शुभ कार्य होणार नाहीत. आणि चातुर्मास जून महिन्यापासून सुरू होईल, त्यानंतर कोणतेही लग्न वगैरे शुभ कार्य 4 महिन्यांनंतरच सुरू होईल.