(मुंबई)
शिवसेना आणि शिंदे गट दोघांनाही शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी बीएमसीने परवानगी दिलेली नाही. दरम्यान, शिंदे गटाने बीकेसीच्या एका ग्राऊंडवर मेळावा घेण्यास शिंदे गटाला परवानगी मिळाली आहे. मात्र अद्याप शिवसेनेला कोणतीही परवानगी मिळालेली नाही. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिंदे गटाचा की शिवसेनाचा यावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय मुंबई महापालिकेने दिलेला नाही. त्यामुळे हे मैदान कुणाला मिळणार, याचा पेच कायम आहे.
दुसरीकडे दोन्ही पक्षांकडून पर्यायी जागांचादेखील शोध घेतला जात आहे. दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावर मेळावा घेता यावा, यासाठीही अर्ज करण्यात आला. या सर्वांमध्ये कोठेच परवानगी न मिळाल्यास उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरें अभिनव आयडिया वापरून यंदाचा दसरा मेळावा गाजवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
खरी शिवसेना कोणाची, हा वाद सुप्रीम कोर्टात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिका शिवाजी पार्क राखीव ठेवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, शिवसैनिकांना शिवाजी पार्कवर एकत्र जमा, असे आदेश खुद्द उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेदेखील बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्या मेळाव्यात रिक्षावर उभे राहून भाषण केले, लोकांना साद घातली होती. तीच पद्धत आता वापरली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.