वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण (सूर्यग्रहण 2023) आज (14 ऑक्टोबर 2023 रोजी) सर्वपित्री अमावस्येला होत आहे. नवरात्रीच्या आधी होणारे हे ग्रहण काही राशींच्या घरात आनंद आणणार आहे. याआधी 1845 मध्ये सूर्यग्रहण आणि सर्वपित्री अमावस्या एकत्र आल्यावर हा आनंददायी योगायोग घडला होता. या दुर्मिळ संयोगाच्या वेळी बुध आणि सूर्य देखील कन्या राशीत असतील आणि बुधादित्य योग तयार होईल. तसेच आज शनिवार असल्याने या दिवसाला शनि अमावस्या असे म्हटले जाईल, ज्यामध्ये पितरांचे श्राद्ध केल्यास अधिक शुभ फळ प्राप्त होते.
ज्योतिषांच्या मते, हा एक अत्यंत दुर्मिळ योग आहे. शिवाय हा योग जवळपास १७८ वर्षांनी जुळून येत असल्याचंही मानलं जात आहे. त्यामुळे २०२३ मधील शेवटचे सूर्यग्रहण कोणत्या राशींसाठी खास ठरु शकते. यावर्षी १४ ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण होत आहे. जे खूप खास मानले जात आहे. कारण या ग्रहणाच्या वेळी सूर्य आणि बुध दोघेही कन्या राशीत असणार आहेत. अशा स्थितीत बुधादित्य योग तयार होत आहे. तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी यापुर्वी १८४५ साली सूर्यग्रहण लागले होते. जे आता १७८ वर्षांनंतर पुन्हा लागणार आहे.
मिथुन रास
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण मिथुन राशीच्या लोकांना विशेष लाभ देऊ शकते. या काळात तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जीवनात अनेक प्रकारचे आनंद मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता.
मकर रास
मकर राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचा विशेष लाभ मिळू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. अनेक प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. तुम्हाला आर्थिक संकटातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
तूळ रास
वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण तूळ राशीच्या लोकांचे भाग्य उजळवू शकते. या राशीच्या लोकांना समाजात मान-सन्मान मिळू शकतो. या काळात तुम्हाला व्यवसायात अफाट यश मिळून मोठी कामे करता येऊ शकतात. पैशाशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडू शकतात तसेच तुम्ही बचतही करु शकता. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला लाभ होऊ शकतो.
(टीप : वरील माहिती सामाजिक मान्यता व प्राप्त माहितीनुसार देण्यात आला आहे.)