(दापोली)
नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत दापोली तालुक्यातून १९पैकी १५ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधील असून, कर्दे शाळेचा प्रणव वैजयंत देवघरकर व कुडावळे नंबर १ शाळेचा प्रणित प्रशांत किरवे या दोघांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला; तर ओननवसे पाटील शाळेतील प्रणाली प्रकाश टेमकर हिने तालुक्यात द्वितीय आणि गावरई शाळेतील परी रमेश प्रजापती हिने तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
विशेष म्हणजे गावरई शाळेतील तीन आणि कर्दे शाळेतील दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. व्हिजन दापोलीचे सचीव शशिकांत बैकर आणि सदस्य वैजयंत देवघरकर या मुख्य समिती सदस्यांच्या शाळेत अनुक्रमे तीन आणि दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. तर व्हिजन अध्यक्ष धनंजय शिरसाट यांच्या केंद्रातील कुडावळे आणि कादिवली शाळेतील प्रत्येकी एक विद्यार्थ्यांने प्राविण्य मिळवले. सर्व विद्यार्थ्यांचा यथायोग्य सत्कार सोहळा मान्यवरांचे हस्ते करणेत येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले.
सदर सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्व पर्यवेक्षिय यंत्रणा यांचे शिक्षण विभाग पंचायत समिती दापोलीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी,अण्णासाहेब बळवंतराव, विस्ताराधिकारी, बळीराम राठोड, रामचंद्र सांगडे, पद्मन लहांगे यांनी तसेच सर्व केंद्रप्रमुख यांनी कर्दे, गावरई, कादिवली, कुडावळे, चंद्रनगर, हर्णे, ओळगाव, पंचनदी, सातेरे तर्फ नातू, राजापूर या शाळांमध्ये भेट देत सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.