(दापोली)
भारतीय बौद्ध महासभा दापोली तालुका, मुंबई विभाग जिल्हा शाखा रत्नागिरी, ग्राम शाखा वणंद व माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वणंद येथील माता रमाई राष्ट्रीय स्मारक येथे माता रमाई यांच्या १२७ व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त शुक्रवारी सकाळी ११.३० वा. अभिवादन सभा होणार आहे. या सभेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहाणार आहेत. रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अनंत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे वणंद ग्रामशाखा अध्यक्ष दीपक धोत्रे स्वागताध्यक्ष असून सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस एन. बी. कदम व दापोली तालुकाध्यक्ष सुनिल धोत्रे करणार आहेत.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. एस. के. भंडारे, महिला राष्ट्रीय उपाध्यक्षा सुषमाताई पवार, राष्ट्रीय सचिव तथा केंद्रीय प्रशिक्षण विभागप्रमुख ॲड. एस. एस. वानखेडे, राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र राज्य प्रभारी भिकाजी कांबळे, कोषाध्यक्ष प्रशांत गडकरी, संस्कार विभाग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय कांबळे, प्रचार पर्यटन उपाध्यक्ष उत्तम मगरे, संस्कार सचिव रविंद्र गवई, महाराष्ट्र राज्य व कोकण विभाग संघटक जयवंत लव्हांडे, गिम्हवणे वणंद सरपंच साधना देवघरकर, ग्रामस्थ सी. डी. कदम आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. तरी या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.