(संगलट-खेड/ इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील व मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात एस.टी बसला समोरून येणा-या टेंम्पो ट्रॅव्हल्सचा चालक सागर विश्राम नागले (वय 26 रा. ठाणा) याने रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता अविचाराने, हयगयीने आपल्या ताब्यातील टेंम्पो ट्रॅव्हल्स हा 18 आसनी टेंम्पो चालवून समोरून येणा-या एस.टी बसला धडक देऊन, बसमधील व आपल्या टेंम्पोतील प्रवाशांच्या छोट्या मोठ्या दुखापतीस व दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भादवि 279, 337, 338 आणि मोटर कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना दि 8/05/2022 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याची खबर प्रमोद नागोराव डोंगरे वय 37 रा. एस. टी. डेपो खेड यांनी येथील पोलीसात दिली.
घटनेची हकिकत पोलीस कंट्रोल रूम कडून प्राप्त झालेल्या माहितीवरून खबर देणार एस.टी. बस चालक असून ते आपल्या ताब्यातील एस.टी. बस (नंबर एमएच 20 बीएल 0876) ही खेड ते चिपळुण या मार्गावर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून चालवित असताना आरोपीत टेंम्पो ट्रॅव्हल्स नंबर (एमएच 04 एफवाय 9192) वरील चालक सागर विश्राम नागले याने समोरून येणा-या एस. टी. बसला धडक देऊन अपघात केला.