(मुंबई)
महाराष्ट्राचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयाने मंगळवारी (22 ऑक्टोबर) जामीन मंजूर केला. पण सध्या ते कारागृहातून बाहेर येऊ शकणार नाहीत. त्यांच्यावर अँटिलिया प्रकरणात खटला सुरू असून तो तुरुंगात आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध 100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली होती. मनसूख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील कैदेमुळे वाझेचा मुक्काम तूर्तास कारागृहातच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सचिन वाझे हे तुरुंगात होते. 2020 मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासोबतच मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि 100 कोटींच्या खंडणी प्रकरणातही त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.
त्यानंतर या प्रकऱणात त्यांच्यार निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली. विशेष सीबीआय न्यायालयाने गेल्यावर्षीच सचिन वाझे यांना जामीन दिला होता. पण इतर दोन गुन्ह्यांतही ते आरोपी असल्याने गेल्यावर्षीपासून त्यांचा तुरुंगवास लांबला आहे. जामीनासाठी त्यांनी मे महिन्यांत पुन्हा अर्जही केला होता. पण तेव्हाही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला.