रत्नागिरी :- भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून दिनांक 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. या कालावधीत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खालीलप्रमाणे विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येणार आहे.
प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्दी (सोमवार) दि.01 नोव्हेंबर 2021 रोजी, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी (नमुना नं.6, 6अ, 7, 8 व 8अ) (सोमवार) दि.01 नोव्हेंबर 2021 ते (मंगळवार) दि.30 नोव्हेंबर 2021, विशेष मोहिमांचा कालावधी (शनिवार) दि.13 नोव्हेंबर, 2021 व (रविवार) दि.14 नोव्हेंबर, 2021, (शनिवार) दि.27 नोव्हेंबर 2021 व (रविवार), दि. 28 नोव्हेंबर, 2021. दावे व हरकती निकालात काढणे (सोमवार) दि.20 डिसेंबर 2021 पर्यंत, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे (बुधवार) दि.5 जानेवारी 2022
16 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत गावातील नागरिकांनी मतदार यादीतील त्यांची नोंदणी तपासणी व नवीन मतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये मतदार यादीच्या चावडी वाचनाचा उपक्रम गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचावा याकरिता सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन 16 नोव्हेंबर 2021 करण्यात आले आहे.
सदर मोहिमे दरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून मतदारांचे अर्ज स्विकारणार आहेत. सदर मोहिमेचा मतदारांनी लाभ घ्यावा. ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी त्वरीत नमुना नं. 6 चा फॉर्म भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना मतदान केंद्रावर दयावे. सदर नमुने मतदान केंद्रावर, तहसिलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच मतदार नोंदणी अर्ज तहसिलदार कार्यालयात अथवा NVSP या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline App (VHA) या मोबाईल ॲपवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच तृतीय पंथीय आणि देह व्यवसाय करणा-या स्त्रिया यांनाही आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन, नाव नोंदणी करता येणार आहे. त्यांची नाव नोंदणी करुन घेण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी कागदपत्रे मतदान केंद्रावर, तहसीलदार कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच DEO यांचे Facebook व Instagram या समाजमाध्यमाद्वारेही त्यांना पाहता येतील.
Ø दि.01/01/2022 रोजी ज्या व्यक्तींचे वय 18 वर्षे पूर्ण होणार आहे, त्या व्यक्तींनी आपले नाव मतदार यादीत सामाविष्ट होण्यासाठी नमुना नं.6 भरुन दयावा.
Ø ज्यांचेकडे मतदान ओळखपत्र आहे अशाही मतदारांनी मतदान केंद्रावर जावून त्यांची नावे मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करावी.
Ø मतदार यादया तपासणीसाठी मतदान केंद्रावर उपलब्ध असतील.
Ø विशेष मोहिमेच्या वेळी राजकीय पक्ष मतदान केंद्रस्तरीय सहायक(BLA)उपस्थित ठेवू शकतील.
Ø दि.01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने गावातील नागरिकांनी मतदार यादीतील त्यांची नोंदणी तपासणी व नवीन मतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये मतदार यादीच्या चावडी वाचनाचा उपक्रम गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचावा याकरिता प्रत्येक गावामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीच्या ठिकाणी 16 नोव्हेबर 2021 रोजी करण्यात आले आहे. तरी या विशेष ग्रामसभेच्या आयोजनाचा लाभ जिल्हयातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी केले आहे.
——-