( कॅलिफोर्निया )
ॲपल कंपनीचा आयफोन- १५ हा नवा फोन लवकरच बाजारात येणार आहे. १२ किंवा १३ सप्टेंबर रोजी ॲपलच्या कॅलिफोर्निया मुख्यालयात नवी सीरिज लॉन्च होणार आहे. तसेच २२ सप्टेंबरच्या आसपास हा फोन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ॲपलने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून दिली आहे.
या सिरिजमध्ये आयफोन-१५ या मालिकेत आयफोन-१५, आयफोन-१५ प्लस, आयफोन-१५ प्रो, आयफोन-१५ प्रो मॅक्स ही विविध मॉडेल्स असणार आहेत, असेही ॲपलने ट्विटमध्ये म्हटले. आयफोनच्या या नवीन मॉडेलमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. ज्यामध्ये क्वालकॉम मॉडेम चिप्स, ॲडवान्स ३- नैनोमीटर ए१७ चिप, पेरिस्कोप लेंस- एन्हांस्ड झूम, यूएसबी-सी पोर्ट, नॉच-फ्री इमर्शन तसेच टायटॅनियम फ्रेमसह अत्याधुनिक वैशिष्ट्य आहेत. भारतात या फोनची किंमत ७७,९९० रुपये इतकी असेल. यामध्ये आयफोन-१५ च्या या मूळ मॉडेलमध्ये ८ गीगाबाइट रॅम आणि २५६ गीगाबाइट इटरनल स्टोरेज असणार आहे. आयफोन-१५ प्रो ची किंमत १,३९,९०० रुपयांपासून, तर आयफोन-१५ प्रो मॅक्सची किंमत १,५९,९०० रुपयांपासून सुरू होऊ शकते.
आता अशी माहिती येत आहे की, iPhone 15 सीरीजच्या सर्व मॉडल मध्ये डायनामिक आयलँड मिळणार आहे. आयफोन १५ सीरीज सोबत नवीन आयफोन मध्ये कोणकोणते फीचर्स मिळू शकतात, याची गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू आहे. आयफोन चाहत्यांना आता आयफोन १५ या सीरीजची मोठी उत्सूकता लागली आहे.