(रत्नागिरी)
राणी लक्ष्मीबाईंनी “मै अपनी झांसी नाही दुंगी” असे म्हणत ६/७ वर्षाच्या मुलाला पाठीवर घेत ४ एप्रिल १८५८ रोजी झांसीच्या किल्याबाहेर पडल्या आणि त्यांनी इग्रजांविरुद्ध निकराचा लढा दिला. राणी लक्ष्मीबाईं यांचा जन्म १९ नोव्हे १८३५ मध्ये वाराणसीत झाला. झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांचेशी त्यांचा विवाह मे १८४२ मध्ये झाला. नेवाळकरांचे मूळ गाव लांजा जवळील कोट. ॲड विलास पाटणे यांनी राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा अक्षरबद्ध केली आहे. या पुस्तकाला सध्याचे आघाडीचे कादंबरीकार पानिपतकार विश्वास पाटील यांनी सुंदर प्रस्तावना लिहिली आहे.
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धामध्ये, त्याकाळी देशात ४०० संस्थानिक असताना केवळ राणीनी अदभुत आणि रोमांचकारी लढा दिला अणि वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी १८ जुन १८५८ रोजी देशाकरीता वीरमरण पत्करले ॲड विलास पाटणे यांची यापूर्वी सापडलेले आकाश संचित, पारिजात अपरान्त आणि न्या रामशास्त्री आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रामशास्त्री पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
कमांडो पथकाचे प्रमुख श्री सुर्वे यांचा अतुलनीय पराक्रम व त्याग त्यांच्याच तोंडून ऐकण्याविषयी जाणकारांच्या मध्ये उत्सुकतेची भावना आहे .सौ. अनुराधा प्रभुदेसाई, अध्यक्ष लक्ष्य फाउंडेशन सूत्रसंचालन सौ पूर्वा पेठे तर पसायदान ईशानी पाटणकर सादर करतील.
सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाचे अध्यक्ष विश्वनाथ बापट यांनी केले आहे
वेळ: रविवार दि २० नोव्हे २०२२ सायंकाळी ५.३०
स्थळ: मराठा भवन, रत्नागिरी