(संगमेश्वर)
७५वा स्वातंत्र्यदिन व अमृत महोत्सव वर्षानिमित्त पोलीस ठाणे संगमेश्वर येथे सामाजिक मंच, संगमेश्वरच्या वतीने कार्यक्रम कार्यक्रम संपन्न झाले. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, पोलिस अंमलदार किशोर जोयशी, स्वप्निल तेरवणकर, संजय मोहिते, तसेच महिला पोलीस अंमलदार यांचा सत्कार करण्यात आला.
पोलिसांची गेल्या तीन वर्षातील उल्लेखनीय कामगिरी, त्याचप्रमाणे विविध उपक्रम राबविणारे उपक्रमशील पोलीस ठाणे म्हणून संगमेश्वरमधील सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक मंच ने दखल घेतली. मंचाचे पदाधिकारी संस्थापक दिनेश अंब्रे, अध्यक्ष माधवीताई भिडे, उपाध्यक्ष श्री.प्रकाश कोळवणकर, तसेच सल्लागार व तंटामुक्ती अध्यक्ष श्री.प्रमोद शेट्ये(नावडी), तळमळीचे कार्यकर्ते विशाल रापटे आदी पदाधिकाऱ्यांनी शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख यांचा यथोचित सन्मान केलाव त्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच पोलिसांना गुलाब पुष्प देऊन मान्यवर श्री.प्रमोद शेट्ये, दादा कोळवणकर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. पोलीस अंमलदार (ड्रायव्हर) स्वप्निल तेरवणकर यांची बालिका स्वरा स्वप्नील तेरवणकर हिने या कार्यक्रमाच्या वेळी “दिल दिया है,जान भी देंगे, ए वतन तेरे लिए !”हे देशभक्तीपर गीत गायले. मंचाच्या वतीने स्वरा हिला भेटवस्तू व पुष्प देऊन तिचा सन्मान पोलीस अधिकारी श्री.उदय झावरे व प्रवीण देशमुख यांनी केला व तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री.प्रमोद दादा शेट्ये यांनी यावेळी पोलीस खात्याची देशसेवा व विशेष कामगिरीबद्दल विचार व्यक्त केले व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी महिला पोलीस अंमलदार यांचा ही गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.