(नवी दिल्ली)
गॅम्बिया येथे ही कफ सिरप घेतल्याने ६६ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. हे कफ सिरप भारतीय कंपनी असलेल्या हरियाणाच्या मेडन फार्माने तयार केले होते. हे सर्व सिरप उच्च दर्जाचे असल्याचे चाचणीतून समोर आल्याचा दावा केंद्र सरकारने केला असल्याने कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.
मेडेन फार्माच्या चार कफ सिरपमुळे गॅम्बियामध्ये ६६ मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. हे सर्व कफ सिरप ‘मानक दर्जाचे’ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या सिरपचे कन्ट्रोल सॅम्पल चाचणी आणि विश्लेषणासाठी चंदीगडमधील रिजनल ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आले होते. या लॅबने याच्या अहवालात हे सॅम्पल मानक दर्जाचे असल्याचे म्हटले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय रसायन आणि खते मंत्री भगवंत खुबा यांनी राज्यसभेत दिली.