(खेड / भरत निकम)
खेड शहरातील सिद्धिविनायक मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या सिद्धिविनायक वास्तू प्रकल्प ए विंग मधील सचिन बाळकृष्ण सुर्वे (वय ४४ ) या इसमाने स्वतःच्या राहत्या घराच्या बेडरूममधील सिलिंग फॅनला नायलॉन रशीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३१ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान घडली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.