(रत्नागिरी)
गतवर्षी जिल्ह्यातुन जाणा-या मुंबई-गोवा, मि-या-नागपूर, गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्ग व चिपळूण-कराड, संगमेश्वर-कोल्हापूर, खेड पोलादपूर या राज्य मार्गावरून जाणा-या वाहनांना शिस्त लावण्यासाठी जिल्हातील कशेडी, चिपळूण, हातखंबा या महामार्ग वाहतुक पोलीस मदत केंद्राचे पोलिसांकडून मदतकेंद्र व महामार्गावर इंटरसेप्टर वाहनाद्वारे विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली होती. त्यामध्ये एकूण १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत ३०४८४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन कोटी आठ लाख पंचवीस हजार आठशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना, रत्नागिरी विभाग महामार्ग वाहतुक पोलिस निरीक्षक रेश्मा कुंभार यांनी सांगितले की, चालू वर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या दरम्यान महामार्ग वाहतूक पोलिस महासंचालक ठाणे यांच्या आदेशानुसार महामार्गावरील नियम तोडणा-या बेशिस्त वाहनचालकांवर व अवजड व अतिरिक्त भार वाहुन नेणा-या वाहनांवर दंडात्मक कारवाईची विशेष मोहिम राबविण्यात आली. गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे दोन्ही राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाहतुकीमध्ये घट झालेली होती. त्यानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढलेली असल्याने काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात त्याचा फटका इतर वाहनांना बसुन अपघात होतात व शिवाय महामार्ग चौपदरीकरण काम अर्धवट असल्याने खराब महामार्गाच्यामुळे अपघातात वाढ होत आहे. त्यासाठी शिस्त लागण्यासाठी कारवाई केली जाते.
चालूवर्षी इंटरसेप्टरद्वारे अति वेगाने जाणाऱ्या ८०५२ वाहन चालकांवर १,६१,५३,८०० रूपयांची दंडात्मक कारवाई केली,वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करताना १ चालकावर कारवाई करून १००० रूपयांचा दंड, वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणार्या २१५८ चालकांवर ५,६९,८०० रुपये दंड, वाहनांना पुढे व मागे रिफलेक्टर न लावणार्या २९८ चालकांवर कारवाई करून ३,१४,००० रुपये दंड, मागील बाजूस लाईट बंद असणाऱ्या ४ चालकांवर कारवाई करून ५,००० रुपये दंड, अवजड वाहन उजव्या बाजूच्या लेन मधून चालवणार्या २५ चालकांवर कारवाई करून १८,५०० रुपये दंड, अविचाराने व बेदरकारपणे वाहन चालवणार्या २ चालकावर कारवाई करून ४,००० रुपये दंड, नो पार्किंग मध्ये वाहने लावणार्या ५ चालकावर कारवाई करून ३,५०० रुपये दंड करण्यात आला.
अवजड ट्रेलर व ट्रक यांसारख्या वाहनांतून फाळका न लावता उघडपणे मोठे पाईप व लोखंडी सळई सारखे साहित्य वाहतूक करणाऱ्या २८ चालकांवर कारवाई करून २४,५०० रुपये दंड, मालगाडीतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या ११४ चालकांना ६१,००० रुपयांचा दंड, सिग्नल जम्पिंग करणार्या १०४६ वाहन चालकांवर ६,४०,००० रुपये दंड,दुचाकीवर विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या ५४९९ वाहनचालकांवर २७,५१,००० रुपये दंड, तसेच विना विमा वाहन चालवणार्या ३२० चालकांवर कारवाई करून ६,४२,००० रुपये दंड, अवैध प्रवासी वाहतूक २ वाहनांवर कारवाई करून १०,५०० रुपये दंड, फ्रंट सीट असणार्या १०२ चालकांवर कारवाई करून ४७,५०० रुपये दंड, धोकादायक माल वाहतूक करणाऱ्या ३ वाहनांवर कारवाई करून १,५०० रुपये दंड करण्यात आला
वाहनांचे वैध कागदपत्रे सादर न करणार्या २,८३६ चालकांवर कारवाई करून १५,६४,५०० रुपये दंड, गणवेश परिधान न करणार्या १४ चालकांवर कारवाई करून ७,००० रुपये दंड, बॅच न लावणार्या ४२२ चालकांवर कारवाई करून २,४२,००० रुपये दंड, विरुद्ध बाजूला पार्किंग करणार्या १ चालकावर ५,०० रुपये दंड, विना परवाना वाहन चालविणाऱ्या ११९ चालकांवर कारवाई करून ५,९२,ooo रुपये दंड, वाहना बाहेर माल वाहतूक करणाऱ्या ६३ चालकांवर कारवाई करून ८४,००० रुपये दंड,फॅन्सी नंबर प्लेट असणार्या २४१ वाहनांवर कारवाई करून १,४७,५०० रुपये दंड, काळ्या काचा असणाऱ्या ३२ चालकांवर कारवाई करून १७,७०० रुपये दंड, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या २ वाहनांवर कारवाई करून १,००० रुपये दंड, प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६५ वाहनांवर कारवाई करून १३,००० रुपये दंड, दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणार्या ६२ चालकांवर कारवाई करून ५९,५०० रुपये दंड, इतर प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ८,९६८ चालकांवर कारवाई करून ६८,४९,५०० रुपये दंड अशाप्रकारे तीन कोटी आठ लाख पंचवीस हजार आठशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गतवर्षी जिल्हातील याच राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावर प्राणांकित २१६ अपघातांमध्ये ६५ मयत झाले होते तर गंभीर व किरकोळ २७६ जखमी झाले होते.
रत्नागिरी विभाग महामार्ग पोलीस निरीक्षक रेश्मा कुंभार यांनी बोलताना सांगितले की, काही राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण प्रलंबित असतानाही त्यावर योग्य त्या अपघात रोधक उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच शाळा, महाविद्यालये, ट्रक टर्मिनल व इतर सार्वजनिक ठिकाणी वाहन चालकांचे प्रबोधन केले जात आहे. जिल्ह्यातील महामार्गांवर वाहतुकीचे नियमन करण्याची व अपघात रोखण्याची मोहिम म.पो.म.केंद्र कशेडीचे पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे, म.पो.म. केंद्र चिपळूण पोलीस उपनिरीक्षक अजय यादव, म.पो.म. केंद्र हातखंबा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील, विक्रमसिंग पाटील यांच्या सह सर्व महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचा-यांनी ही दंडात्मक कारवाई मोहीम राबवली आहे.