(रत्नागिरी)
संगमेश्वर तालुक्यातील दि एज्यूकेशन सोसायटी कडवई शिक्षण व सामाजीक क्षेत्रात गेली ६० वर्ष अविरतपणे आपली सेवा देत आहे. १९६२ ला रुजलेले हे रोपटे आज महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई, दि कडवई इंग्लिश स्कूल, कालसेकर ज्यूनियर कॉलेज ऑफ सायन्स व कालसेकर बॉईज हॉस्टेलच्या माध्यमातून वटवृक्षात रूपांतरित झाले आहे.
संस्थेच्या या दैदीप्यमान शैक्षणिक व सामाजिक इतिहासाला उजाळा देण्यासाठी २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी जश्न ए कडवई या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाकरिता जिल्हाभरातून व राज्यभरातून अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सादिक काझी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अन्सार जुवळे, मुख्याध्यापक प्रांजल मोहिते, अफसर खान उपस्थित होते.