(चिपळूण / प्रतिनिधी)
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा देशभरात सन- २००५ पासुन लागू करण्यात आला असून, शासनाने वेळोवेळी उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमुख झाला आहे. महाराष्ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम- २००५ या कायदयाच्या व्यापक प्रसिध्दीसाठी व प्रभावी अंमलबजावणी करीता शासन स्तरावरुन सर्वतोपरी उपाययोजना करण्याची मागणी माहिती अधिकार महासंघ महा.राज्य, मुंबई चिपळूणचे माहिती अधिकार क्रियाशील कार्यकर्ता रत्नागिरी जिल्हा प्रचारप्रमुख श्री.योगेश पेढांबकर यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
२८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय हा स्तरावर दिवस कायदयातील तरतुदी, कार्यपध्दती, याबाबत श्री.योगेश पेढांबकर यांनी विविध दृकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिध्दी देऊन व विविध उपक्रम राबवून त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यन्त पोहोचविण्यासाठी शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन साजरा करण्याचा शासनाच्या निर्देशानूसार साजरा करण्याची मागणी माहिती अधिकार संघटना, चिपळूण या संघटनेने केलेली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, रत्नागिरी जिल्हा तहसीलदार, पोलीस अधिक्षक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, रत्नागिरी, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविदयालये, विदयापिठे व इतर शैक्षणिक संस्थामध्ये माहिती अधिकार या विषयावर आधारीत प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजीत करावी. यासाठी अशासकिय समाजसेवी संस्थांचा सहयोग घेण्यात यावा. हा उपक्रम व्यापक पातळीवर जनसामान्यांना त्यांचे न्याय व अधिकाराबाबत माहिती माहिती होण्यासाठी माहिती अधिकार कायदा प्रभावशाली ठरत अधिकार दिन म्हणून साजरा असून, माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना निवेदन देण्यात आले आहे.