पालघरच्या सुख शांतीनगर परिसरात एका २८ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तृप्ती कौस्तुभ घरत (वय २८) असं या महिला डॉक्टरचं नाव आहे.
तृप्ती यांचा मृतदेह आज सकाळी मंगळवारी (४ ऑक्टोबर) त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. २८ वर्षीय तृप्ती या बीएएमएस एम.डी डॉक्टर होत्या. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. याबाबत कुटुंबियांकडून अधिक माहिती पोलीस घेत आहेत.