(लांजा)
लांजा तालुका जयंती महोत्सव कमिटीतर्फे दि. २० ते २६ नोव्हेंबर या कालावधीत संविधान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम लांजा ग्रामीण रुग्णालयासमोर होणार असून, दररोज सायंकाळी ७ वाजता व्याख्यान होणार आहे.
या सप्ताहाचे उद्घाटन २० नोव्हेंबर रोजी करण्यात आले. त्यानंतर दि. २१ नोव्हेंबर रोजी श्रीकांत कांबळे यांचे ‘भारतीय संविधान भाग-१ संघ राज्य व त्यांचे राज्यक्षेत्र’ या विषयावर दि. २२ रोजी ‘भारतीय संविधान भाग २ नागरिकत्व कलम ५ ते १०’ या विषयावर ॲड. मिलिंद जाधव, दि. २३ रोजी ‘भारतीय संविधान भाग ३ मूलभूत हक्क, सर्वसाधारण हक्क – कलम ५ ते १०’ या विषयावर डॉ. रोहिनील जाधव हे व्याख्यान देणार आहेत.
तसेच दि. २४ रोजी ‘भारतीय संविधान भाग ३ मूलभूत हक्क, स्वातंत्र्याचे हक्क कलम १९ ते २२’ यावर संतोष गोरे, दि. २५ रोजी ‘भारतीय संविधान भाग ३ मूलभूत हक्क शोषणाविरुद्धचे हक्क कलम २३ ते २४’ या विषयावर संतोष जाधव, दि. २६ नोव्हेंबर रोजी ‘भारतीय संविधान भाग-३ मूलभूत हक्क शोषणाविरुद्धचे हक्क कलम २३ ते २४’ या विषयावर ॲड. अमोलकुमार बोधी हे व्याख्यान देणार आहेत. संविधान सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जयंती महोत्सव कमिटीतर्फे करण्यात आले आहे.