(जाकादेवी/संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील खालगांव-जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहामध्ये श्री महालक्ष्मी कलामंच मुंबई(रजिस्टर) या मंडळातर्फे राम शिंदे लिखित वीर शिवाजी हा ऐतिहासिक दोन अंकी नाट्यप्रयोग १ मे रोजी रात्री ठीक ८ वाजता जाकादेवी विद्यालयाच्या सभागृहात सादर होणार आहे असून या महाराष्ट्राभर लक्षवेधी ठरलेल्या नाट्य प्रयोगाचा परिसरातील रसिक व नाट्यप्रेमी मंडळींनी लाभ घेण्याचे आवाहन सुपर इलेव्हन क्रिकेट संघ नारशिंगे आणि अमरज्योत नवतरूण विकास मंडळ नारशिंगे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटक असून या नाटकामध्ये सुमारे ३० पात्रांचा समावेश आहे. छत्रपती शिवरायांचे जीवन, स्वराज्य स्थापन, राजनिती, न्यायव्यवस्था,सुराज्याची संकल्पना, याशिवाय ऐतिहासिक विविध हुबेहूब रंगतदार प्रसंग या नाट्यातून प्रदर्शित करण्यात येणार आहेत. हे नाटक कंपनीचे असून अतिशय गाजलेले नाटक आहे. आतापर्यंत गोव्यासह आपल्या राज्यभरात ३० नाट्यप्रयोग झाले आहेत. खेड्यापाड्यातील अनेक छोटे मोठे जातिवंत कलाकार या नाटकामध्ये सहभागी असल्यामुळे हा नाट्यप्रयोग लक्षवेधी ठरणार आहे.
तरी नाट्यप्रेमी, रसिक, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिवप्रेमी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.महालक्ष्मी कला मंचातर्फे करण्यात येत आहे.