(मुंबई)
सोने आणि दागिन्यांच्या खरेदी विक्रीसाठी आता हाॅलमार्किंग सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्किंगबाबत ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर १ एप्रिल २०२३ पासून फक्त सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. त्याशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत. ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासोबतच चार अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. म्हणजेच ३१ मार्च २०२३ नंतर हाॅलमार्क यूनिक आयडेंटिफिकेशन (एचयूआयडी) शिवाय सोने अथवा दागिने विकले जाणार नाहीत. चार अंकी आणि सहा अंकी हाॅलमार्किंग संदर्भातील गोंधळ दूर करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
सोने आणि दागिने विक्रीसंदर्भात हाॅलमार्किंग सक्ती करण्याचा प्रयत्न गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. पण आता यापुढे हाॅलमार्किंग असल्याशिवाय दागिन्यांची विक्री करता येणार नाही. दागिन्यांच्या ओळखीसाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक असतो. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक हा सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे. यामध्ये अंक आणि अक्षरांचा समावेश असतो. तो ज्वेलर्सद्वारे निवडला जातो. या क्रमांकाच्या मदतीने दागिन्यांशी संबंधित प्रत्येक माहिती उपलब्ध असते. दागिन्यांची शुद्धता, वजन आणि ते कोणी विकत घेतले यांसारखी माहितीचा यात समावेश असतो. ज्वेलर्सना ही माहिती बीआयएस पोर्टलवर देखील अपलोड करावी लागते.
ग्राहक व्यवहार मंत्री पियूष गोयल आणि भारतीय मानक ब्युरो (बीआय़एस) यांच्यात यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. त्यानुसार गोयल यांनी बीआय़एसला देशात चाचणीसाठी पायाभूत सुविधा वाढवण्याचे निर्देश दिले. बीआयएसने आगामी काळात ६६३ उत्पादनांसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश (क्यूसीओ) प्रस्तावित केला आहे. सध्या ४६२ उत्पादनांचा यात समावेश आहे