(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींमधील निवडणुका १८ मे रोजी होणार असून या ३७ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
२५ एप्रिल ते २ मे या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करणे, ३ मे रोजी अर्जाची छाननी, ८ मे रोजी अर्ज मागे घेणे, याच दिवशी दुपारी ३ नंतर चिन्हांचे वाटप, १८ मे रोजी निवडणूक व १९ मे रोजी निकाल, असा कार्यक्रम देवरूख तहसीलकडून जाहीर करण्यात आला आहे.
यामध्ये बामणोली सर्वसाधारण स्त्री १ जागा, डावखोल सर्वसाधारण स्त्री २, धामापूरतर्फे देवरूख सर्वसाधारण स्त्री १, घोडवली सर्वसाधारण स्त्री १, कासे सर्वसाधारण स्त्री ४, सर्वसाधारण १ जागा व नागरिकांचा मागास प्रवर्ग १, काटवली सर्वसाधारण १, कोळंबे सर्वसाधारण १, सर्वसाधारण स्त्री १, कोंडिवरे सर्वसाधारण १, मावळंगे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री १, अनुसूचित जाती स्त्री १, मासरंग सर्वसाधारण स्त्री १, माखजन नागरिकांचा मागास प्रवर्ग १, मुरडव सर्वसाधारण स्त्री १, मेढेतर्फे फुणगूस सर्वसाधारण २, नारडुवे सर्वसाधारण स्त्री १, पांगरी सर्वसाधारण स्त्री १, पुर्येतर्फे सावर्डा सर्वसाधारण १, सर्वसाधारण स्त्री १, रांगव सर्वसाधारण स्त्री १, शिरंबे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री १, सर्वसाधारण स्त्री १, ताम्हाणे सर्वसाधारण स्त्री१, वाशीतर्फे देवरूख सर्वसाधारण स्त्री १, पाटगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री १, सर्वसाधारण स्त्री १, फुणगुस नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री१, तुरळ सर्वसाधारण स्त्री १, सरंद नागरिकांचा मागास प्रवर्ग १, किरडूवे सर्वसाधारण स्त्री १ जागा.