(नवी दिल्ली)
भारतात चित्त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहे. आता दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते भारतातून आणले आहेत. भारतीय हवाई दलाच्या गैलेक्सी ग्लोबमास्टर सी १७ मधून या १२ चित्त्यांना ग्वाल्हेरमध्ये पोहोचले आहेत. दक्षिण अफ्रिकेतून आणण्यात आलेले हे पाहुणे आता भारतात वास्तव्य करणार आहेत. विशिष्ट बॉक्समधून हे चित्ते भारतात आणले गेले. या १२ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कूनो जिल्ह्यातील नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यानापूर कूनो नॅशनल पार्कमध्ये क्वारंटाइन एन्क्लोजरमध्ये सोडले. यावेळी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदलमंत्री भूपेंद्र यादव उपस्थित होते. भारतातील चित्त्यांची संख्या वाढावी या अनुषंगाने दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात एक करार झाला होता. याआधीही ८ चित्ते भारतात आणले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात १२ चित्ते आणले गेले.
मध्य प्रदेशातील जंगलात सोडले
1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. मध्य प्रदेशातील जंगलात सोडण्यात आलेले चित्ते नामिवियातील आहेत. त्यांना या वर्षांच्या सुरुवातीला स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराखाली आणण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी कुनो नॅशनल पार्कमध्ये आठ चित्ते सोडले होते. चित्ते येणे हा भारतातील वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन आणि वैविध्य आणण्याचा एक भाग आहे.
मोदी सरकारने १७ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात आठ चित्ते आणले होते. या चित्त्यांची चर्चा चांगलीच झाली. नामिवियातून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले. १९४७ नंतर पहिल्यांदाच भारतात चित्ते पाहिले गेले. त्याआधी सुरजगुजाच्या राजाने जे आता छत्तीसगढमध्ये आहे तीन चित्ते शिकारीत मारले होते. मात्र आता जे चित्ते आणले गेले आता त्यानंतर १२ चित्त्यांची भर त्यामध्ये पडली आहे.