(रत्नागिरी)
दिनांक १० जुलै या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन भारत सरकारने २००१ मध्ये १० जुलै हा “राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिन” म्हणून घोषित केला आहे. “राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिवस” संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यंदाचे हे २२ वे वर्ष आहे. या वर्षी देखील हा दिवस मोठ्या उत्साहात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत झाडगांव, रत्नागिरी येथे असलेले “सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र” मार्फत साजरा करण्यात आला. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधुन संशोधन केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संशोधन केंद्रामध्ये प्रशिक्षण घेवून, प्रत्यक्ष मत्स्यशेती संबंधित व्यवसाय सुरु केले आहेत, त्यांच्या शेतावर तसेच उद्योगाच्या ठिकाणी जावून प्रातिनाधिक स्वरूपामध्ये २ मत्स्य शेतकऱ्यांचा सत्कार केला.
आडिवरे येथील श्री. शांताराम झोरे त्यांच्या श्री दिपक आणि श्री सागर या उच्चशिक्षित मुलांसह गेली चार वर्षे कोळंबी संवर्धन करत आहेत. या करिता त्यांनी सर्वप्रथम सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी इथे सन २०१७ मध्ये प्रशिक्षण घेतले होते. तसेच बसणी येथील श्री. चिन्मय राणे यांनी आपले पदवी शिक्षण संपताच सन २०१७ मधेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे ‘अॅक्वारीअम मॅनेजमेंट’ चे प्रशिक्षण घेतले होते. त्याने प्रथम बसणी या छोट्या गावामध्येच शोभिवंत मासे बीज उत्पादन आणि संवर्धन सुरु केले. साधारण ४ वर्षांच्या अनुभवानंतर त्यांनी रत्नागिरी शहरामध्ये शोभिवंत मासे, त्या संबंधित साहित्य याचा घावूक आणि किरकोळ विक्रीचा व्यवसाय हल्लीच सुरु केला आहे.
दिनांक १० जुलै राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधुन “सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र” रत्नागिरी तर्फे श्री. शांताराम झोरे यांचे प्रत्यक्ष आडिवरे येथील शेताच्या बांधावर जावून तसेच श्री. चिन्मय राणे यांचे प्रत्यक्ष व्यवसायाच्या ठिकाणी जावून सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगांव, रत्नागिरीचे वरीष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि प्रमुख डॉ. प्रकाश शिनगारे तसेच सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले आणि प्रा. सचिन साटम, अभिरक्षक डॉ. संतोष मेतर आणि श्री अण्णासाहेब कारखिले उपस्थित होते.
सदर कार्यक्रमा करीता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर व शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगांव, रत्नागिरीचे वरीष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रकाश शिनगारे, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रम समन्वयचे काम प्रा. सचिन साटम यांनी पाहिले. या कार्यक्रम करिता संशोधन केंद्राचे सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले, अभिरक्षक डॉ. संतोष मेतर, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाच्या आयोजानाकरिता प्राध्यापक डॉ. आसिफ पागारकर आणि श्री कल्पेश शिंदे यांनीही विशेष मेहनत घेतली.