(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दरवर्षी जगभरातील लाखो माणसे अपघातामुळे मृत्यूमुखी पडतात. यात अनेकांना कायमचे अपंगत्व येते. मात्र, अशा अपघातातील लोकांबरोबरच इतर रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिका ‘लाइफलाइन’ ठरत आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १७ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. गेल्या तीन वर्षांत या रुग्णवाहिकांनी ९६,७४६ जणांना नवजीवन दिले आहे.
वैद्यकीय भाषेत ट्रॉमाला अपघात किंवा कोणत्यातरी वाईट घटनेने शरीरावर झालेला आघात मानला जातो. आघात हा रस्ता अपघात घरगुती हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती आणि इतर अनेक घटनांनी घडलेला अपघात असू शकतो. या आघाताचा शरीरावर आणि मनावर परिणाम होऊ शकतो. या आघातातून लोकांना मदत कशी करावी? त्यांचे प्राण कसे वाचवावे ? यासाठी जगभरात १७ ऑक्टोबर जागतिक ट्रॉमा डे साजरा केला जातो. जिल्ह्यातील या १०८ रुग्णवाहिकांनी गेल्या तीन वर्षांत ९६,७४६ जणांना नवजीवन दिले आहे गाव व अपुऱ्या सुविधा पाहता उपलब्ध असलेल्या १७ रुग्णवाहिका या कमी पडत आहेत. ग्रामीण वस्ती डोंगराळ भाग, रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट अशी आहे. अरुंद आणि नागमोडी वळणाचे रस्ते यामुळे १०८ रुग्णवाहिका यंत्रणेला जलद सेवा पुरवण्यास अडचणीची ठरत आहे. तरीही १०८ रुणवाहिका सेवा देत आहे.
गेल्या तीन वर्षात १४६७ वाहन अपघात झाले. हल्ल्याच्या १०३ घटनांमध्ये रुग्णसेवा दिली. जळलेल्यात १४३ तर कार्डियाक ७५९, पडलेले ६०६, नशा, विषबाधा ११३९, प्रसृती, गर्भधारणा ४८०२, सामूहिक अपघात ६८, वैद्यकीय ६३२०९, इतर २२४८६, पॉली ट्रॉमा १९४०, आत्महत्या २ अशा ९६७४६. रुग्णांचे प्राण वाचवायचे काम १०८ ने केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ४८९ गर्भवती महिलांची प्रसूती ही १०८ मध्येच झाली आहे. डोंगर दयात असलेली गाव व अपुऱ्या सुविधा यामुळे रुग्णालयात पोहचण्याआधीच सुखरूप प्रसूती झाल्या आहेत.
जनजागृतीसाठी पुढाकार
अशा अपघातानंतरच्या मदतीसाठी, अपघात घडू नये यासाठी लोकांमध्ये जनजागृतीसाठी १०८ ने पुढाकार घेतला आहे. जनजागृती शिबिर आयोजित करत लोकांना १०८ च्या टीमकडून जनजागृतीसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी सामाजिक व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी १०८ कडून आवाहन करण्यात आले आहे.