( खेड / इक्बाल जमादार )
दापोली तालुक्यातील मुर्डी गावचे रहिवासी ह.भ.प. श्रीकांत बापट हे१९८६ पासून शिक्षण विभागात कार्यरत असून, सध्या ते केंद्रप्रमूख म्हणून कार्यरत आहेत. ज्या क्षेत्रात जायचं तिथं सर्वोत्तम बनायचं असा मूलमंत्र जपणारे श्री.बापट यांनी सन २०१४ पासून आध्यात्मिक दृष्ट्या समाज प्रबोधन करणेसाठी कीर्तन सेवा सुरु केली.
आत्तापर्यंत त्यांनी अनेक गावात कीर्तन सेवा बजावली आहे. तसेच नव्याने निर्माण झालेला शैक्षणिक आराखडा त्यांनी यु-ट्यूब द्वारे सहज सोप्या भाषेत शिक्षक आणि समाजासमोर मांडला आहे. ते संगिताचे शिक्षण देविदास दातार यांचेकडून घेतात तर कीर्तनाचे शास्रोक्त शिक्षण महेश बुवा काणे ( चिपळूण)यांचेकडे घेतात.
कीर्तन विशारद ही 3 वर्षाची पदवी पूर्ण करुन, सन २०२३ मध्ये कीर्तन अलंकार ही पदवी प्राप्त केली आहे. कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन व भक्ति मार्ग यासाठी प्रयत्नशील आहेत. कीर्तन अलंकार ही पदवी प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.