रत्नागिरी जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रासहित आपला देश कोरोनाशी झुंज देत आहे. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे व त्यामुळे डॉक्टर्स , दवाखाने यांच्यावरील ताण वाढला आहे. याचा विचार करून रत्नागिरी जिल्हा परिषदेने , रत्नागिरी जिल्हा परिषद येथेच एक अभिनव प्रयोग सुरु केला आहे.
यामध्ये आपल्या जिल्ह्यातील होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या सर्व कोरोना रुग्णांसाठी टेलिफोनीक ओपीडी म्हणजेच डॉक्टर ऑन कॉल ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. याचा पुरेपूर फायदा घ्यावा रत्नागिरी जिल्हावासिय कोरोनामुक्त होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे होम आयसोलेशनमधील नागरिकांनी स्वतःला व स्वत:च्या काळजीसाठी समर्थ करावे असाच या मागचा उद्देश आहे.नागरिकांना सर्दी,ताप,खोकला,डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळल्यास डाॅक्टरांशी संपर्क होत नसल्यास किंवा कोरोनाबाबत काही शंका असल्यास तसेच आपली कोविड टेस्ट पाॅझिटिव्ह आली असेल तर तातडीने या टेलिफोनिक ओपीडीशी संपर्क साधावा.ज्या ठिकाणी एकूण 5 डाॅक्टर व चार समुपदेशक आपल्या तात्काळ सेवेसाठी उपलब्ध आहेत.
डाॅक्टर ऑन काॅल या टेलिफोनिक ओपीडीचे काम साधारणतः पुढीलप्रमाणे चालते .सर्वप्रथम जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेमार्फत होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णांची यादी प्राप्त होते.सर्व तालुक्यामधील या रुग्णांना काॅल केला जातो.यामध्ये लक्षणे,उपचार ,आयसोलेशनचे दिवस याविषयी मार्गदर्शन केले जाते.सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या व्यक्तींना ट्रिटमेंटची आवश्यकता आहे.अशा व्यक्तींना वाॅटसअँपद्वारे उपचार दिला जातो.आहाराविषयी मार्गदर्शन ,सहा मिनिटे वाॅक टेस्ट विषयी सूचना,होम आयसोलेशन विषयी नियमावली या विषयी मार्गदर्शन केले जाते.दर दोन-तीन दिवसांनी सदर रुग्णांना फोन करुन फाॅलोअप घेतला जातो.या टेलिफोनिक ओपीडीची खास बाब म्हणजे व्हिडिओ काॅल करूनसुद्धा उपचार सांगितले जातात.
आपल्या जिल्ह्यातील अनेक नागरिक जे याचा लाभ घेत आहेत.त्यामध्ये होम आयसोलेशनव्यतिरिक्त रुग्णांनाही उपचार दिले जातात.होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या काही तक्रारी असतील जसे की होम आयसोलेशन कीट मिळाले कि नाही किंवा इतर आनुषंगिक बाबी त्याविषयी वरिष्ठांशी चर्चा करुन तात्काळ कार्यवाही केली जाते.
अनेक होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण या ओपीडीचा पुरेपूर फायदा घेऊन बरे झालेले आहेत.इतरही नागरिकांनी याचा पुरेपुर लाभ घ्यावा व आपला जिल्हा नक्की कोरोनामुक्त होईल यासाठी सर्वांना मार्गदर्शन करावे.
होम आयसोलेशन रुग्णांसाठी दूरध्वनी क्रमांक- ०२३५२- २२५४०३/२२६४०३/२२७४०३
होम आयसोलेशन रुग्णांसाठी मोबाईल क्रमांक- ८६६९१८७४९२/८६६८२२९८५६
वरील मोबाईल नंबरवर आपण काॅल,व्हिडिओ, ई मेल,वाॅटसअपद्वारे संपर्क साधता येईल.
वरील हेल्पलाईन नंबरवर तज्ञ डाॅक्टरांची टीम तैनात आहे तरी नागरिकांनी आपल्या शंका व समस्या यांचे निरसन करण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.