(रत्नागिरी)
हॉटेलमध्ये पार्सल घेण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला सहा हजार बील पे करण्यासाठी सांगितले. फिर्यादीने बिल पे करण्यात नकार दिला. याचा राग मनात धरून तीन संशयितांनी कोयत्याने व ब्लेडने वार करून दुखापत केली. ही मारहाणीची घटना बुधवार २८ जुन रोजी रात्री दहाच्या सुमारास. मारुती मंदिर जवळील शुभम हॉटेलमध्ये घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीत शरद तातोबा नार्वेकर, अन्वर अली गोलंदाज, सुनील वसंतराव जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री फिर्यादी हे शुभम हॉटेल येथे जेवण पार्सल घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयित तिथे जेवत होते. त्यांनी आपल्या जेवणाचे ६ हजार रुपये बिल फिर्यादीला पे करण्यास सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांनी नकार दिला. याचा राग मनात धरून संशयितांनी त्यांना शिवीगाळ करून हातापायाने मारून कोयत्याने व ब्लेड मारून दुखापत केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध अन्वये गुन्हा दाखल केला आहे.