(अहमदाबाद)
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात क्वालिफाय होणारा गुजरात पहिला संघ ठरला आहे. गतविजेत्या गुजरातने १३ सामन्यात ९ विजय मिळवले आहेत. १८ गुणांसह गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. उर्वरित सामन्याचा विचार केल्यास १८ गुणांपर्यंत फक्त मुंबईचा संघ मजल मारू शकतो. त्यामुळे गुजरातचा संघ क्वॉलिफायर एक सामना खेळणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने यंदा दमदार कामगिरी केली. गुजरातने १३ सामन्यांत नऊ विजय मिळवले तर चार पराभवाचा सामना केला.
𝗣𝗹𝗮𝘆𝗼𝗳𝗳𝘀 𝗦𝗽𝗼𝘁 𝗦𝗲𝗮𝗹𝗲𝗱! ✅
Presenting the first team to qualify for the #TATAIPL playoffs! #GTvSRH
𝗚𝗨𝗝𝗔𝗥𝗔𝗧 𝗧𝗜𝗧𝗔𝗡𝗦 👏🏻👏🏻 pic.twitter.com/1std84Su6y
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2023
मोहम्मद शामीच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर गुजरातच्या संघाने हैदराबादच्या संघाचा ३४ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. या सामन्यात शुभमन गिल आणि साई सुदर्शनच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे गुजरातच्या संघाला २० षटकात ९ विकेट्सच्या मोदबल्यात १८८ धावापर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात हैदराबादच्या संघाला २० षटकात १५४ धावा करता आल्या. गुजरातच्या गोलंदाजांनी कमाल केली. त्यामुळे हैदराबादला रोखण्यात यश आले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणा-या गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने वृद्धिमान साहा याला माघारी धाडले. त्यानंतर गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरातचा डाव सावरला. दोघांनी दुस-या विकेटसाठी ८४ चेंडूत १४७ धावांची भागिदारी केली. त्यामुळे गुजरातच्या डावाला आकार मिळाला. त्यामुळे गुजरातला १८९ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर हैदराबादचा डावही घसरला. त्यामुळे गुजरातचा ३४ धावांनी विजय झाला. मात्र, हैदराबादचा पराभव झाल्याने त्यांना दिल्लीनंतर आयपीएलमधून बाहेर पडावे लागले.
शुभमन गिल आणि साई सुदर्शन व्यतिरिक्त गुजरातच्या कोणत्याही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही. हार्दिक पाड्या (६ चेंडू ८ धावा), डेव्हिड मिलर (५ चेंडू ७ धावा), राहुल तेवतिया (३ चेंडू ३ धावा), दासुन शनाका (नाबाद ९ धावा) आणि राशीद खान (० धाव) यांसारखे मोठे फलंदाज आज अपयशी ठरले. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. मार्को जान्सेन, फारुकी आणिटी नटराजन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.