[ मुंबई ]
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानाला आजपासून सुरुवात झाली. आज पहिल्याचं दिवशी विरोधक टिकेकारांच्या भुमिकेत पाहायला मिळाले. “आम्ही लोकशाहीचा खून करणाऱ्यांच्याविरोधात उभे आहोत. हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, बेईमानांचं सरकार आहे. अशी संतप्त टिका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानाला आजपासून सुरुवात होताच विरोधकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध केला. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून ईडी सरकार हाय हाय, स्थगिती सरकार हाय हाय अशा घोषणाबाजी करत शिंदे फडणवीस सरकारचा जोरदार निषेध केला. शिंदे -फडणवीसांना जनतेचा आवाज ऐकू जात नाही तसचं शिंदे गटाचं घटनेविरोधी काम असल्याचा घणाघात यावेळी आदित्य ठाकरेंनी केला.