(मुंबई/प्रतिनिधी)
संपूर्ण महाराष्ट्रात एप्रिल महिना उष्ण राहिला. मात्र आता मे महिन्यातील कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील तापमान एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात कमी होण्याची शक्यता आहे. पुणे हवामान खात्याने मे महिन्यात बहुतांश भागात सरासरी कमाल तापमानाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, मान्सूनपूर्व पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल. राष्ट्रीय स्तरावर, वायव्य राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान अपेक्षित आहे आणि देशभरात मान्सूनपूर्व पाऊस सरासरीपेक्षा 109 टक्के जास्त असेल. अशा परिस्थितीत आता मान्सूनच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मे महिन्यात महाराष्ट्रातील तापमान कमी राहील. हवामान खात्यानुसार, या महिन्यात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहिल तर किमान तापमान थोडं अधिक राहणार आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील उन्हाच्या झळांची तीव्रता कमी होईल, असंही सांगण्यात आलंय.
येत्या काही महिन्यांत, गोवा आणि कर्नाटकात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील आणि पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहील. मे महिन्यात महाराष्ट्रासह या राज्यात उष्णतेची तीव्रता कमी असेल.