(संगमेश्वर)
तालुक्यातील बुरंबी येथे गुरुवार दिनांक ०९.०२.२०२३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बुरंबी तर्फे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे, तरी या शिबिरामध्ये शुगर तपासणी, ब्लडप्रेशर, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच इतर प्रकारच्या सर्व रक्त तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. तसेच आवश्यक त्या सर्वांचे ईसीजी काढले जातील व ज्या व्यक्तींच्या ईसीजी रिपोर्ट मध्ये काही दोष आढळल्यास त्या व्यक्तींवरती पुढील उपचार अथवा शस्त्रक्रिया या वालावलकर हॉस्पिटल डेरवण येथे मोफत केले जाणार आहे. सदर शिबीर सकाळी १० ते ४ या वेळेत सुरु राहणार आहे.
तरी या आपल्या कार्यक्षेत्रातील सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित व्यक्ती, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी या शिबिरामध्ये आपल्या गावातील जास्तीत जास्त व्यक्तींना सहभागी होण्यासाठी व शिबिराचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करावे, असे वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र बुरंबी यांनी कळविले आहे.