(रत्नागिरी)
पाकिस्तानचे उद्दाम परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत हिंदुस्थानचे पंतप्रधान आणि जागतिक प्रभावी नेते नरेंद्रजी मोदी यांचे संदर्भात अवमानकारक उद्गार काढले. हिंदुस्थानच्या पंतप्रधानांबद्दल कंगाल पाकिस्तानच्या मंत्र्यांचे हे आक्षेपार्ह निंदनीय वक्तव्य हिंदुस्थानची जनता कदापि सहन करणार नाही. हा संदेश देत भा.ज.पा रत्नागिरीने बिलावल भुट्टो यांच्या विरोधात, पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली. बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला मारल्या. बिलावल भुट्टो यांचे फोटो जाळले. पाकिस्तानच्या निंदनीय वर्तनाचा धिक्कार केला.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी न्यूयॉर्कमध्ये केलेल्या अवमानकारक टिप्पणीचा जाहीर निषेध करण्यासाठी देशभराप्रमाणे रत्नागिरी मध्येही भा.ज.पा.चे निषेध आंदोलन केले. या आंदोलनात भा.ज.पा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचे सह श्री मुन्ना चवंडे, श्री. सचिन करमरकर, श्री.प्रमोद खेडेकर, श्री.राजू तोडणकर, श्री.दादा ढेकणे, श्री.विक्रम जैन, श्री. समीर दळी, सौ. वर्षा ढेकणे, श्री.ओमकार फडके, श्री.शैलेश बेंद्रे, सौ.शरयू गोताड, श्री.प्रवीण देसाई, श्री. शेखर लेले, श्री.बाबू पेडणेकर, श्री.राकेश भाटकर, श्री.राजन पटवर्धन इ. उपस्थित होते.