( प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील कातवण येथून वाशी फळबाजारात गेलेल्या पहिल्या दोन डझन आंबा पेटीला ९ हजार रुपये दर मिळाला. कातवण येथील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूसची पहिली दोन डझनची पेटी फळबाजारात पाठवली होती.
आंबा बागायतदार दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे यांच्या बागेत असलेल्या हापूसच्या कलमांना १५ ऑगस्टच्या आसपास मोहोर येण्यास सुरवात झाली होती. प्रयोग म्हणून आलेला मोहोर टिकवण्यासाठी शिंदे बंधूंनी खूप मेहनत घेतली.
मोहोराची काळजी घेतल्याने त्यातून उत्तम फलधारणा झाली. त्यामुळेच चार कलमांवरील उत्पादित झालेल्या आंब्याचे पहिले फळ काढून ‘देवगड हापूस’ची पहिली पेटी विधिवत पूजा करून वाशी फळबाजारात पाठविण्यात आली होती. वाशी फळबाजारातील आंबा व्यापारी अशोक हांडे यांच्याकडे आंबा पेटी पाठविण्यात आली होती. पहिल्या दोन डझन पेटीला ९ हजार रुपये दर मिळाल्याचे सांगण्यात आले.