(संगमेश्वर)
तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी’गाव तिथं शाखा’ स्थापन करण्यावर जोर दिला आहे. तालुकाध्यक्ष राजन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हातीव येथे रविवारी (दिनांक १० डिसेंबर २०२३) तालुका पदाधिकाऱ्यांनी शाखेचे दणक्यात उद्घाटन केले.
हातीव शाखेची स्थापन करून सक्रिय कार्यकर्त्यांची तत्काळ कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली. यामध्ये शाखा अध्यक्ष सिद्धार्थ शिवगण, उपाध्यक्ष उदय कांबळे, सरचिटणीस अस्तिक जाधव, सह सचिव राहुल शिवगण प्रमुख संघटक अशोक शिवगण, शाखा संपर्क प्रमुख मंगेश शिवगण, कोषाध्यक्ष संजय कांबळे, सदस्य दीपक शिवगण, सदस्य सुशील शिवगण या सर्वांना वंचितच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. तसेच नियुक्त केलेल्या शाखा पदाधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजन मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष श्रीपाद मोहिते, सरचिटणीस सचिन जाधव, प्रकाश कांबळे, प्रमुख मार्गदर्शक विजय जाधव, संतोष जाधव, संदेश जाधव, राजेंद्र कांबळे, प्रवीण कदम, प्रीती कदम, माधुरी कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांचा ‘गाव तिथं शाखा स्थापन करण्याचा निर्धार
शिवाजी पार्क येथील ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या सभेनंतर तालुक्यात वंचित पदाधिकाऱ्यांनी शाखा बांधणी कार्यक्रम हाती घेतले आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत गाव तिथं शाखा स्थापन करण्याचा निर्धार वंचीत आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. उंबरे भीमनगर, चांदिवणे, काटवली, ओझरे, अशा विविध ठिकाणी शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत.