(जीवन साधना)
सौंदर्यात भर घालणारे किंवा सौंदर्य खुलविणारे म्हणून शरीरावरील तिळाकडे पाहिले जाते. अनेकदा महिला, मुली ब्यूटी स्पाॅट म्हणून मेकअप करताना कृत्रिम तीळ लावून घेतात. बदलत्या काळानुसार तीळ लावण्याची फॅशनच आली आहे. परंतु शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरील तिळाचे वेगळे महत्व आहे. सुख, समृद्धी, आनंद, त्रास, नैराश्य आदी येण्यास तिळाची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले जाते.
शरीरावर 12 पेक्षा जास्त तीळ असतील तर अशुभ मानले जाते, तर 12 पेक्षा कमी तीळ असणे शुभ समजले जाते. पुरुषांच्या शरीरावर उजव्या बाजूला तीळ असणे शुभ आणि फायदेशीर मानले जाते. तर स्त्रियांच्या डाव्या बाजूला तीळ शुभ आणि फायदेशीर मानले जाते. तीळ आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर असू शकतो. असे मानले आहे की, तळहातावरील तीळ मुठी बंद केल्यावर दिसत नसल्यास शुभ असतो. मुठीत तीळ बंद होत असलेल्या व्यक्तीना खूप भाग्यशाली मानले जाते. अशा व्यक्ती जीवनात सर्व प्रकारच्या भौतिक सुखाचा आनंद घेतात. जीवनातील मोठमोठी कार्य हे अगदी सहज करून टाकतात. हे धनवान होण्याचे संकेत आहेत असेही मानले जाते. हातावरील काही तीळ शुभ तर काही अशुभ परिणाम देणारे असतात.
- अनामिकेच्या खाली तीळ असल्यास सामाजिक कार्य, सरकारी कार्य आणि नोकरीत कष्ट सहन करावे लागतात. पोलिस किंवा कोर्टासंबंधी प्रकरणातही अडकू शकतात.
- हातातील चंद्रपर्वतावर तीळ असल्यास त्या व्यक्तीचे मन अस्थिर आणि अशांत राहतं. अश्या लोकांना प्रेमात धोका आणि अपयश हाती लागतं. लग्न उशिरा होतं. तसेच हा तीळ आरोग्यासाठी वाईट परिणाम देणारा ठरतो, असे मानले जाते.
- ज्यांच्या करंगळीवर तीळ असतो, ते संपन्न असतात. पैश्याची त्यांना काही कमी नसते, पण इतर काही घरगुती तक्रारी, त्रास असतात.
- मधल्या बोटावर तीळ असणे शुभ मानले आहे. हे सुख-संपत्ती प्रदान करतं. पण मधल्या बोटाखाली शनी पर्वतावर तीळ असल्यास चांगले परिणाम मिळत नाहीत. अश्या व्यक्तीला वारंवार अपयश हाती लागत असतं.
- अनामिकेवर तीळ असल्यास सरकारी क्षेत्रातून लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते. अशा व्यक्ती धनवानही असतात.
- अंगठ्यावर तीळ असणारे व्यावहारिक, कर्मठ आणि न्यायप्रिय असतात.
- अंगठ्याखाली शुक्र पर्वतावर तीळ असणार्या व्यक्तींना प्रेम प्रकरणांमुळे जीवनात नुकसान सहन करावं लागतं. अशी व्यक्ती कामुक आणि खूप खर्च करणाऱ्या असतात. पण यात एक चांगली गोष्ट म्हणजे या लोकांना पैश्याची कमी भासत नाही.
- डाव्या हातात तीळ असणारे भरपूर पैसा कमवतात, पण खर्चाळू स्वभाव असल्यामुळे ते बचत करू शकत नाहीत.
- उजव्या हाताच्या वरील भागावर तीळ असणाऱ्या व्यक्ती धनवान असतात, असे मानले जाते.
टीप: सर्वसामान्य ज्ञान व प्रचलित गृहितके यावर आधारित वरील माहिती आहे.