(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील देवूड लावगण येथे विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदय सदाशिव देसाई (वय ५७, रा. देवूड लावगण देसाईवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी (ता. १) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल महेंद्र खापरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.