(रत्नागिरी)
हातखंबा येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघात प्रकरणातील ट्रकचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश गोविंद कळसे असे संशयित ट्रकचालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १८) मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथील पुलाच्या पलीकडे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार मारुती साखळकर हे ट्रक घेऊन मुंबई- गोवा मार्गावरून पालीच्या दिशेने जात होते. हातखंबा येथील पुलाच्या पलीकडे आले असता समोरून येणारा ट्रक चालक याने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालवून ट्रकला धडक दिल्याने अपघात केला. या अपघातात ट्रकच्या हौद्यात बसलेला राजेंद्र बाबल्या डांगे (वय ४०, रा. हातखंबा- रत्नागिरी) यांच्या अंगावर कहाण्या पडल्याने गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला तसेच टेम्पोवरील चालक गणेश गोविंद कळसे त्यामधील प्रवासी शशिकांत कीर हे जखमी झाले. या प्रकरणी ओंकार मारुती साखळकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली