( रत्नागिरी / प्रतिनिधी )
तालुक्यातील हातखंबा बोंबलेवाडी येथे पूर्ववैमनस्यातून प्रौढाच्या डोक्यात फावडयाने मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दत्ताराम बाळकृष्ण सागवेकर ( हातखंबा , बोंबलेवाडी , रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद गजानन आबा देवरुखकर ( बोंबलेवाडी , हातखंबा ) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन देवरुखकर आणि दत्ताराम सागवेकर हे एकाच वाडीत राहणारे आहेत. त्यांचे ४ वर्षापूर्वी भांडण झाले होते . त्यामुळे एकमेकांशी बोलत नव्हते , दि . १७ जुलै रोजी सायंकाळी ४.१५ वा . च्या सुमारास गजानन देवरुखकर हे घरातून दुकानात जात असताना दत्ताराम सागवेकर याने मागील भांडणाचा राग मनात धरुन देवरुखकर यांना खुन्नस दिली . आणि अंगावर धावत गेला . तसेच रस्त्याचे गटाराचे काम करणारे कामगारांचे फावडे हातात घेऊन देवरुखकर यांच्या उजव्या हातावर मारुन जखमी केले . तसेच छत्रीही डोक्यात मारुन जखमी केले . जखमी देवरुखकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात याबाबत फिर्याद दाखल केली . त्यानुसार दत्ताराम सागवेकर याच्यावर भादविकलम ३२४ , ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .