(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा परिसरात गेल्या चार दिवासांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार हातखंबा परिसरात वाढले आहे. त्यामुळे गृहिणींसह छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.
महावितरण कर्मचारी, अधिकाऱ्यांना देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली दर सोमवारी शहरासह ग्रामीण भागात सक्तीचा वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. तरीही चार दिवसांपासून हातखंबा परिसरात चार ते पाच तास वीज खंडित करण्यात येत आहे. या परिसरात कोणत्या ना कोणत्या कारणाने वीज खंडित करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दैनंदिन व्यवहारावर परिणाम होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
वाढीव वीज बिल, जुने मीटर यांसारख्या समस्यांमुळे वीजग्राहक आधीच त्रस्त आहेत. त्यामूळे महावितरण कंपनीने योग्य उपाययोजना करून विजपुरवठा अखंडित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.