(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गावाच्या विविध विकास कामांसाठी पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी ५.५० कोटी रुपयाचा निधी देत विविध विकास कामांचे भूमिपूजन केले आहे. गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द पालकमंत्री यांनी यावेळी दिला.
महिला वर्गासाठी विविध योजना शासन राबवत आहे. महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. उद्योग धंद्यात महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे.मुख्यमंत्री रोजगार योजनेचा लाभ घेवून उद्योग सखी व्हा. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करण्याचे काम पालकमंत्री म्हणून मी करणार आहे. हातखंबा गावातील विकासाचा रथ असाच पुढे नेणार असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमासाठी तालूका प्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, सुर्वे मॅडम, कांचन नागवेकर विभाग प्रमुख सचिन सावंत, मुन्ना देसाई, निवळी सरपंच तन्वी कोकजे, हातखंबा सरपंच जितेंद्र तारवे, प्रमोद लकेश्री, सुरेश तारवे, मनीषा देसाई, रमाकांत बोंबले, प्रमोद डांगे, योगेश सनगरे, शांताराम कदम, संजय भुते सुनील डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.