(रत्नागिरी)
तालुक्यातील हातखंबा तिठा येथे अवैधरित्या मटका जुगार चालवणाऱ्यावर ग्रामीण पोलिसांकडून कारवाई करण्यात आल़ी. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांकडून छापा टाकण्यात आल़ा. याप्रकरणी एका संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केल़े. रविंद्र सोनू मालप (45) असे संशयित आरोपीचे नाव आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हातखंबा तिठा येथे अवैधरित्या जुगार चालविला जात असल्याची माहिती मिळाली होत़ी, त्यानुसार 21 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास ग्रामीण पोलिसांकडून छापा टाकण्यात आल़ा. यावेळी संशयित आरोपी हा अवैधरित्या जुगार चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आल़े. संशयिताविरूद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा आहे.