(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यात अवैधरित्या दारू बाळगणाऱ्यावर पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून सोमवारी छापा टाकण्यात आल़ा. हातखंबा बोंबलेवाडी व काळबादेवी मयेकरवाडी येथे ही कारवाई करण्यात आल़ी. या प्रकरणी 2 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल़ा असून त्यांच्याकडून पोलिसांनी अवैध बाळगलेली दारू जप्त करण्यात आल़ी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळबादेवी मयेकरवाडी येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत़ी. त्यानुसार 6 मार्च 2023 रोजी ग्रामीण पोलिसांकडून छापा टाकून कारवाई केल़ी. संतोष यशवंत मयेकर (48, ऱा काळबादेवी, मयेकरवाडी) याच्या ताब्यात अवैध गावठी दारू आढळल़ी, तर हातखंबा बोंबलेवाडी येथे करण्यात आलेल्या कारवाईत संशयित आरोपी नीलेश जानू माईंगडे (45, ऱा भोके माईंगडेवाडी) याच्या ताब्यात पोलिसांना अवैध गावठी दारू आढळून आल़ी. दोन्ही संशयितांविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 ई नुसार गुन्हा दाखल केल़ा. या पकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.