(संगमेश्वर / प्रतिनिधी)
अनेक गणेशमूर्तिकार आपापले वेगळेपण टिकवून आहेत. त्यांच्या अंगभूत कलेतून त्यांनी हे वेगळेपण निर्माण केले आहे. अशांपैकीच एक म्हणजे कसबा येथील अविराज कानसरे हे युवा मूर्तिकार. हस्तकलेतून मूर्ती साकारण्याची कला ते जोपासत आहेत. सध्या गणपती बाप्पांची लगबग सुरू आहे. यांच्या कारखान्यात शाडूच्या मातीपासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्ती साचांचा वापर न करता केवळ हाताच्या साह्याने साकारले जातात.
अविराज हे गेली २० वर्षे सातत्याने नवनवीन गणपती बाप्पा साकारताना दिसत आहेत. अविराज यांचे वडील आणि भाऊ अशा त्रिमूर्तींच्या हातून बाप्पा घडत असतात. कानसरे यांच्या मूर्तिशाळेची खास वैशिष्ट्ये म्हणजे डोळ्यांची रेखणी आणि गणपतीला फेटा आणि धोतर गेली तीन वर्षे फेटेधारी बाप्पाची क्रेझ पाहायला मिळत आहे.
गेली दोन वर्षे अविराज यांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आणि एका हाताला जोरदार मारा बसला आहे. एवढ्या मोठ्या प्रसंगातून बाहेर कसं पडायचं, हा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात येत होता. कारण, गणपतीला काहीच महिने शिल्लक असतानाच दोन्हीवेळा संकटात सापडले; परंतु त्यातूनही काहीतरी मार्ग काढू शकतो, असा आत्मविश्वास होता आणि हातापायाची दुखापत असताना देखील त्यांनी गणेशाचं कामं न थांबवता पूर्ण करत आहेत