(दापोली)
तालुक्यातील हर्णे नवानगर येथे समुद्रकिनारी सोमवारी सायंकाळच्या सुमारास चरसाची आठ पाकिटे सापडली असून, त्याचे अंदाजे वजन आठ किलो आहे, दापोली पोलिसांच्या किनाऱ्यावरील गस्ती दरम्यान ही पाकिटे सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मुरुड समुद्रकिनारी सोमवारी (ता. १४) चारसाची १५ पाकिटे केवड्याच्या बनात आढळली होती, त्यानंतर दापोली पोलिसांनी परिसरातील समुद्रकिनारी आणखी काही पाकिटे समुद्रातून वाहून आल्याची शक्यता लक्षात घेऊन समुद्रकिनाऱ्यावर तपासणीची मोहीम राबविली. या मोहिमेत हरणई नवानगर परिसरात आठ चरसाची पाकिटे पथकाला सापडली असून, त्याचा पंचनामा करून ती जप्त केली. पुढील काही दिवस ही मोहीम सुरूच ठेवणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी दिली आहे.
गुजरात समुद्रकिनारीही असाच प्रकारची चरसाची पाकिटे आढळली असून, गस्ती पथकाला घाबरून ही चरसाची पाकिटे समुद्रात टाकल्याची शक्यता आहे.