(लांजा)
तालुक्यातील हर्चे येथील पनोरची खालची वाडीच्या मौज मस्ती धमाका ज्ञान – कला – क्रीडा मंडळाच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्याने मंडळामार्फत आयोजित विविध कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्री सत्यनारायण पूजेनिमित्त वाडीतील कष्टकरी मंडळींना आनंद, मनोरंजन मिळावे या उद्देशाने स्थापन केलेल्या मौज मस्ती धमाका, ज्ञान – कला – क्रीडा मंडळ पनोरची खालची वाडी हर्चेने प्रतिवर्षी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवून हर्चेवासियांना आनंदाची पर्वणी दिली आहे. यावर्षीही मंडळामार्फत भव्यदिव्य प्रभातफेरीच्या आयोजनाने रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ झाला तर लेखक सूर्यकांत सावंत लिखित आणि राजा वाडेकर दिग्दर्शित सांभाळ तुझं सौभाग्य या बहारदार नाटकाने समारोप करण्यात आला.
दरम्यान त्यापूर्वी मानाच्या मौज मस्ती धमाका चषकाचे अनावरण झाले. यावेळी वाडीचे अध्यक्ष जनार्दन वाडेकर, सुधीर वाडेकर, ग्रामपंचायत सदस्य रमाकांत वाडेकर, ग्रामस्थ बाळकृष्ण तरळ, गणपत वाडेकर, दाजी वाडेकर, विलास वाडेकर, प्रभाकर वाडेकर, संजय वाडेकर, शिवराम वाडेकर, तुकाराम तोस्कर तसेच एकता महिला मंडळ आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. मर्यादित सोळा संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद नार्वेकरवाडी यंगस्टार ने पटकाविले तर साईगौरव पनोरची खालची वाडी यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे –
उत्कृष्ट फलंदाज – निलेश नार्वेकर ( यंगस्टार नार्वेकरवाडी ), मालिकावीर – संकेत शेडेकर ( साईगौरव ) गोलंदाज – अभिजित धनावडे ( सत्तेश्वर देऊळवाडी ) क्षेत्ररक्षक – प्रितम तेंडुलकर ( यंगस्टार ) शिस्तबद्ध – एकता तांबेवाडी
विजेत्या संघास रोख रुपये 2325, तर उपविजेते यांना ₹ 1325, शिस्तबद्ध संघ ₹ 525 आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सरपंच दीप्ती तरळ, उपसरपंच संजय नवाथे, पोलीसपाटील दिपक तरळ, हर्चे हायस्कूलचे माजी प्राचार्य विलास पाटील, व्ही. पी. पाटील आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन आणि सूत्रसंचालन सुहास वाडेकर यांनी केले.
याचवेळी हर्चे हायस्कूलचे अध्यापक व्ही. पी. पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्तीपर सन्मान केला. त्यांना मंडळाच्यावतीने सन्मानचिन्ह बहाल केले. महिलांसाठी आयोजित संगीतखुर्ची स्पर्धेत विजेत्या, उपविजेत्या अनुक्रमे रेवती वाडेकर, वर्षा वाडेकर यांना रोख बक्षीस आणि पैठणी प्रदान करण्यात आली. फनीगेम्स मध्ये विजेते मुलगे – मुली यांनाही बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या कलावंत मुलांनादेखील मंडळाच्यावतीने पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते राम ( भाऊ ) तरळ, एकनाथ तरळ, स्मिता बंडबे, हरिषजी तिखे, विलास मोरे, जितेंद्र आंब्रे, जेष्ठ नाटककार दशरथ रांगणकर, ध्वनीसंकलक हर्षद तरळ, प्रणिता खांबे, मोहन तरळ, सुशिल वाडेकर, भाग्यश्री वाडेकर यांनी विशेष सहकार्य केले. तर स्पर्धा नियोजन आणि आयोजनासाठी मंडळाचे राजा वाडेकर, संतोष तरळ, किरण वाडेकर, संदेश वाडेकर, शांताराम वाडेकर, अमित तरळ, दत्ताराम वाडेकर, स्वप्नील तरळ, अक्षय तरळ, संदीप तरळ, तेजस वाडेकर, सागर तरळ, अभिषेक तरळ, तुषार तोस्कर, संकेत तरळ, विश्वभंर तरळ, अजिंक्य वाडेकर, जगदीश वाडेकर, आर्यन वाडेकर, निखिल वाडेकर, विशाल वाडेकर, प्रविण तरळ, नितीन तरळ, समीर वाडेकर, आशिष वाडेकर, अनिकेत वाडेकर, उमेश तरळ यांनी विशेष परिश्रम घेतले.