केंद्र सरकारनं हरवलेल्या किंवा चोरीला गेल्या मोबाइल फोनला ट्रॅक करण्यासाठी संचार साथी पोर्टल www.sancharsaathi.gov.in लाँच केलं आहे. हे पोर्टल भारतातील सर्व टेलीकॉम युजर्ससाठी फायदेशीर ठरेल. ह्या पोर्टलच्या मदतीनं युजर्स चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या फोनला ट्रॅक करण्यासह ब्लॉक देखील करू शकतील. तसेच स्वतःच्या नावावर किती फोन नंबर रजिस्टर आहेत याची माहिती देखील मिळवू शकतील.
चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन ब्लॉक कसा करायचा
स्टेप 1 : सर्वप्रथम संचार साथी पोर्टल – https://sancharsaathi.gov.in/ वर लॉगइन करा. इथे दिलेल्या लिंकव्हर क्लिक करून तुम्ही संचार साथीवर जाऊ शकता.
स्टेप 2 : या वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला संचार साथी पोर्टलसंबंधित सर्व्हिसेजची माहिती दिसेल. इथे तुम्हाला मेन मेन्यूवर ‘सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस’ वर क्लिक करा.
स्टेप 3 : सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस ऑप्शनवर क्लिक करताच नवीन पेज ओपन होईल, ज्यात दोन ऑप्शन दिसतील. मोबाइल फोन ब्लॉक करण्यासाठी ऑप्शन ‘ब्लॉक युवर्स स्टोलन/लॉस्ट फोन’ वर करा.
स्टेप 4 : एक नवीन पेज ओपन होईल, ज्यात तीन ऑप्शन मिळतील. पहिला – ब्लॉक स्टोलन/ लॉस्ट मोबाइल, दुसरा अनब्लॉक फाउंड मोबाइल आणि तिसरा चेक रिक्वेस्ट स्टेटसचा असेल. फोन ब्लॉक करण्यासाठी पहिला ऑप्शन निवडा.
स्टेप 5 : आता नवीन पेजवर तुम्हाला मोबाइल नंबर, IMEI नंबर, फोन ब्रँडचं नाव, मोबाइलच्या बिलाची कॉपी, पोलीस कंप्लेंट आणि कोणत्या ठिकाणी स्मार्टफोन चोरी झाला ही सर्व माहिती भरावी लागेल.
स्टेप 6 : सर्व डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती द्यावी लागेल, ज्यात तुमचं नाव, पत्ता, आयडेंटिटी आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून ओटीपी वेरीफिकेशन करावं लागेल.
स्टेप 7 : आता तुम्हाला तुमची कम्प्लेंट रिक्वेस्ट आयडी नंबर मिळेल. ज्याच्या मदतीनं तुम्ही स्टेटस चेक करू शकता.
फोन ब्लॉकचं स्टेटस कसं चेक करायचं
स्टेप 1 : चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या फोनची तक्रार केली असेल तर ह्या पोर्टलवर तुम्ही तुमच्या कम्प्लेंटचं स्टेटस देखील चेक करू शकता. ह्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम होम पेजवर ‘सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस’ वर क्लिक करावं लागेल.
स्टेप 2 : इथे Check Request Status वर क्लिक करा.
स्टेप 3 : नवीन पेज ओपन होईल जिथे रिक्वेस्ट आयडी सबमिट करा आणि तुम्हाला तुमच्या कम्प्लेंटची माहिती मिळेल.
फोन मिळाल्यावर असा करा अनब्लॉक
जर तुमचा हरवलेला फोन तुम्हाला मिळालं तर ब्लॉक केलेला फोन तुम्ही संचार साथी पोर्टलच्या मदतीनं अनब्लॉक देखील करू शकता. ह्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.
स्टेप 1 : होम पेजवर ‘सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस’ वर क्लिक करून ‘अनब्लॉक फाउंड मोबाइल’ वर क्लिक करा.
स्टेप 2 : नवीन पेजवर तुम्हाला अनब्लॉकचं कारण विचारलं जाईल. चार पर्यायांपैकी एकाची निवड करा.
स्टेप 3 : त्यानंतर कॅप्चा कोड, मोबाइल नंबर टाका आणि ओटीपी वेरीफिकेशन टाका.
स्टेप 4 : सबमिट केल्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबर अनब्लॉकची रिक्वेस्ट आयडी मिळेल. नंतर तुम्ही अनब्लॉकचं स्टेटस चेक करू शकता.