(मुंबई)
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण गोठवल्यानंतर रवी राणांनी हनुमान चालिसाचा संदर्भ देत टीका केली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घेरलं होतं. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा अट्टहास केल्यानंतर राणा दांपत्याला अटक देखील झाली होती.
आम्हाला 14 दिवस तुरूंगात टाकलं. आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, असं रवी राणा म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेचा विरोध केला. त्यामुळे प्रभू श्रीरामांनी उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावून घेतला, असा खोचक टोला रवी राणांनी लगावला आहे.
हनुमानाने उद्धव ठाकरेंना हा शाप दिलाय. म्हणूनच धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलंय. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेला विरोध केला त्याचीच त्यांना सजा मिळाली, असं रवी राणा म्हणाले.